राजकीय
काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर मनपा निवडणूक समिती सदस्यपदी भीमराव शिंदे यांची नियुक्ती..!
सोलापूर (रमेश सुरवसे):आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका निवडणुक समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष भीमराव (मामा)शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
सदर निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी शिंदे यांना दिले आहे.शिंदे यांच्या निवडीबद्दल सचिन सुरवसे,आकाश वाघमारे, सचिन कांबळे,चिंटू कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे.



