Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप..! श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम

Admin by Admin
June 23, 2025
in सोलापूर
0
पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप..! श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या 
जोरावर यशोशिखर गाठावे 
सोलापूर ( प्रतिनिधी )- स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे. उच्चपद भूषवून सेवा बजावावी. आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी केले.
रविवारी, डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी ते बोलत होते. विचार मंचावर अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे,  खजिनदार संजय राठोड, विश्वस्त संतोष भोसले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, ॲड. नितीन हबीब, ॲड. पी. बी. लोंढे – पाटील, सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत ,एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, द न्यूज प्लस चॅनलचे प्रमुख तात्यासाहेब पवार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदी  उपस्थित होते.
याप्रसंगी दैनिक सकाळच्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष केत आणि बी. आर. न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अश्विनी तडवळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मनीष केत यांनी आपल्या भाषणात अन्नछत्र मंडळाच्या कार्याचा गौरव केला. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.
चौकट. –
विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी : पाटील
विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवली पाहिजे. त्या माध्यमातूनच अभ्यासाच्या जोरावर यश मिळते. निश्चित ध्येय ठरवून नियोजनात्मक वाटचाल केली पाहिजे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी योगा व सूर्यनमस्कार केले पाहिजे, असे मार्गदर्शन सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी केले.
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी

Next Post

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

Admin

Admin

Next Post
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697