सामाजिक

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट येथे रक्तदान शिबिर संपन्न

अक्कलकोट – ( प्रतिनिधी )
लायन्स सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी लायन्स शिशु व प्राथमिक शाळा, अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अभय खोबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, तर प्रमुख उपस्थिती झोन चेअरमन ला. मल्लीकार्जुन मसुती यांची होती.शिबिरामध्ये लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पिका  यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली व अथक प्रयत्नांतून हे शिबिर अत्यंत यशस्वी झाले.यामध्ये एकूण ३१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली सेवा दाखवून दिली.रक्तसंकलनासाठी दामाणी रक्तपेढी व बसवेश्वर रक्तपेढी यांच्या सेवांचा लाभ घेण्यात आला.त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. याप्रसंगी लायन विठ्ठल तेली , लायन सलगरकर , लायन शिवपूत्र हळगोदे , लायन शिवशरण खुबा , सचिव शिरीष पंडित आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब अक्कलकोटचे सर्व पदाधिकारी, सदस्य व शाळेतील संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button