मनोरंजन
दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांना कर्नाटक रत्न पवर स्टार पुनीत राजकुमार पुरस्कार

अक्कलकोट – ( प्रतिनिधी )
तालुक्यातील तोळणूर येथील दिव्यांग गायक झी कन्नड सारेगमप सिंगर रेवणसिद्ध फुलारी यांना मानाचा
कर्नाटक रत्न पवर स्टार पुनीत राजकुमार अवॉर्ड २०२६ हा मानाचा पुरस्कार दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार टीव्ही ४ न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
बेंगळुरू येथील डॉ. बी.आर. आंबेडकर भवन यलहंका बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कन्नड चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते ,अभिनेत्री,प्रसिद्ध गायक यांच्या उपस्थितीत टीव्ही फोर कन्नड न्यूज चॅनेल प्रमुख डॉ. साई सतीश तोटय्या यांच्या हस्ते रेवणसिद्ध फुलारी यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,प्रसिद्ध अभिनेते कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांच्या मूर्ती व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
संगीत क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या जोरावर विशेष ओळख निर्माण करणाऱ्या रेवणसिद्ध फुलारी यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास अनेक कलाकार, बिग बॉस सीजन १२ चे स्पर्धक ,मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






