प्रकाश हनमंते यांची काँग्रेसच्या अनु जातीचे तालुकाध्यक्षपदी निवड

नायगांव / नांदेड : (सय्यद अजीम नरसीकर )काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश अनु जातीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षखाली जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी नायगाव खैरगाव तालुका कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये काँग्रेस कमिटी अनु. जाती या विभागासाठी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्व. खा. वसंतराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक.प्रकाशभाऊ निवृत्ती हनमंते यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल. प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण. जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर. प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल दादा सावंत श्रीनिवास पा. चव्हाण विजय पा. चव्हाण स. रहीम स. मीर माजी सभापती प.स. तालुकाध्यक्ष संजय बेळगे शत्रुघन वाघमारे. संभाजी पाटील भिलवंडे ,काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई,नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पा. चव्हाण,काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते गजानन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रतिनीधी नारायण पा जाधव , शहराध्यक्ष.पांडू पा चव्हाण,माणिक चव्हाण रवींद्र भालेराव पंढरी भालेराव, साईनाथ चनावार प्रकाश कामळजकर पत्रकार सय्यद अजिम नरसीकर, सर्व समाज बांधवासह पत्रकार मित्र परिवार अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .