सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांचा वटवृक्ष मंदिरात  सत्कार

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांचा सह परिवार अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात आला. भगवान चंदे यांनी सह परिवार  गुरुवार दि. २२ मे रोजी श्री वटवृक्ष स्वामी समर्थ  मंदिरात दर्शन घेतले. मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांचा स्वामी स्वामींचा प्रसाद कृपा वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी त्यांचे पुत्र अभिषेक चंदे यांचा सपत्नीक   सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य स्वामीराव गायकवाड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डीजिटल मीडिया सोलापूर लोकसभा अध्यक्ष राजेश जगताप , पदाधिकारी रमेश भंडारी , दिपक चंदे , सुदर्शन पाटील , भगवान चंदे संजय फरडे , श्रीशैल गवंडी योगेश पवार, स्वामीभक्त उपस्थित होते.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या सत्कार बद्दल ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे   यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे तसेच सचिव आत्माराम घाडगे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीतर्फे भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button