शैक्षणिक
नागनहळळी आश्रमशाळेत तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे भव्य उद्घाटन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रमशाळेत तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन समारंभ जिल्हा क्रीडा व शिक्षण विभाग, पंचायत समिती अक्कलकोट व नागनळी आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव जावेद पटेल, उपाध्यक्ष जलील पटेल, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष व लायन्स क्लब अक्कलकोटचे नूतन अध्यक्ष ला. अभय खोबरे, नूतन सचिव ला. शिरीष पंडित,नूतन खजिनदार ला. विठ्ठल तेली, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, शिवलाल राठोड, क्रीडा शिक्षक परमेश्वर व्हसुरे, उमेश नेवाळे, नागराज कलबुर्गी, प्रकाश सोनटक्के, दयानंद उटगे, सेवानिवृत्त शिक्षक गोविंद महाबोले, अविनाश राठोड,प्राचार्य मुजावर आय.एम. मुख्याध्यापक शेख आर. जी.यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश नेवाळे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव जावेद पटेल यांच्या हस्ते लायन्स क्लब अक्कलकोट येथील नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख पाहुणे ला. शिरीष पंडित यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करून खेळाचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने खेळांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
प्राचार्य मुजावर यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, क्रीडा शिक्षक व खेळाडू या सर्वांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध खेळ खेळून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन केले.
प्रशालेच्या संगीत विभागाने स्वागतगीत, देशभक्तीपर गीत संगीत शिक्षक रुद्राक्ष वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केले. क्रीडा शिक्षक प्रशांत राचट्टे यांनी विद्यार्थ्यानां क्रीडा शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गुरव व प्रा. मनोज जगताप तर आभार क्रीडा शिक्षक राजेंद्र साखरे यांनी मानले.




