शिवडी मुंबई येथे सुदर्शन सेवा संघाच्या वतीने भंन्ते संघास भोजनदान व विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवडी / मुंबई (प्रतिनिधी) : विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती संपुर्ण जगात अतिशय जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रम भव्य रॅली, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवडी, परळ, भोईवाडा दादर, काळाचौकी, वडाळा या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय उत्साहाने व जोमाने साजरी करण्यात येते.
शिवडी मुंबई येथील सुदर्शन सेवा संघ (रजि) व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ गेली काही वर्षे सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करित आले आहे..सुदर्शन सेवा संघ नेहमीच सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असते. सालाबाद प्रमाणे यंदाही सुदर्शन सेवा संघाच्या वतीने परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी सुदर्शन सेवा संघाच्या वतीने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या भिक्खू संघासाठी भोजनदानाचा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भोजन दान झाल्यानंतर भिक्खु संघाकडून धम्म देसना देण्यात आली. महिलांना आपल्या ग्रह ग्रस्तीतून या जयंती महोत्सवा मध्ये सहभाग घेता यावा व या महोत्सवाचा आनंद लुटाता यावा याच अनुषंगाने महिलांसाठी “खेळ खेळूया पैठणीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विभागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यातील लपलेला टॅलेंट बाहेर येण्यासाठी एक सुंदर असा “शिवडी जिनियर्स टॅलेंट शो” ( Sewri Genius Talent Show व शालेय विद्यार्थ्यांसाठी “रंग माझे सोबती” चित्रकला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सलग तीन दिवस चालत असलेल्या कार्यक्रमाचा सांगता काल करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन सेवा संघ(रजि) व उत्सव समितीचे अध्यक्ष गुणवंत भालेकर, महेश तांबे सेक्रेटरी, प्रतीक जाधव खजिनदार, सुजित लांडगे उपाध्यक्ष, अभिषेक लांडगे उप सेक्रेटरी, विराज जाधव उपखजिनदार, स्वप्निल लांडगे क्रीडासचिव, संदेश गांगुर्डे उपक्रीडासचिव, ऍड. विकास गांगुर्डे विशेष सल्लागार त्यासोबतच आजी माजी समिती आणि मंडळाचे सर्व सभासद तसेच स्थानिक रहिवाशी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.



