सामाजिक

अक्कलकोट शहरात ऐन दसरा सणाच्या तोंडावर पाण्यासाठी शिमगा !

 

नगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत होईना ! अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट शहरात दसरा सणाच्या तोंडावर अबालवृद्धानां  पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून सणाच्या तोंडावर पाण्यासाठी शिमगा सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून तोही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
 सध्या दसरा सणानिमित्त नागरिकांनी घराची रंगरंगोटी , कपडे धुणे , स्वच्छता आदी कामे हाती घेतली आहेत. पण नगरपालिका प्रशासनाकडून दहा-बारा दिवस झाले तरी पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. घर स्वच्छता , कपडे धुणे यासाठी पाणी लागत असून पाणीच येत नसल्याने अबाल वृद्धांची मोठी धांदल उडाली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणात शंभर टक्के पाणी असून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. अक्कलकोट नगरपालिका प्रशासनाकडून मात्र पाणीपुरवठ्यास विलंब होत असल्याने नागरिकांचा संयमाचा बांध सुटत आहे. सणासुदीमध्ये तरी नगरपालिका प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत .मुबलक पाणी असताना अक्कलकोट शहरास चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य असताना नगरपालिकेकडून याची उपायोजना होताना दिसत नाही. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करून तो चार दिवसाआड करण्याचे सांगितले आहे. पण याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार कधी असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .सणासुदीमध्ये तरी नगरपालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशी अपेक्षा अक्कलकोट शहरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button