शैक्षणिक

रेखा लक्ष्मण सोनकवडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ). जि .प .प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी 5 सप्टेंबर लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अध्यक्ष शिवानंद नंदरगी यांच्या हस्ते देण्यात आला .लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला .रेखा सोनकवडे यांचे शैक्षणिक सामजिक कार्य उत्तुंग आहे .त्यासाठी यापुर्वी पण अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .पुरस्काला उत्तर देताना रेखा सोनकवडे म्हणाल्या की मला लायन्स क्लब नी माझी निवड करून पुरस्कार देऊन सन्मानित केलात त्याबद्दल अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करते .यापुढे अजूनही माझी जबाबदारी वाढली .शिक्षकांना सन्मानित करून बहुमान दिलात कार्याची दखल घेतली यामुळे प्रेरणा मिळते आणि ते शिक्षकांना शाबासकीची थाप दिली कौतुक केलं त्यामुळे पूर्णपणे आभारी आहे .सत्कार प्रसंगी पंचप्पा सोनकवडे सुनिता सोनकवडे अनुसया कलशेट्टी नीलिमा जाधव रत्नाबाई रेऊरे कविता फड तोलान बागवान चनम्मा परीट इत्यादी उपस्थित होते .अतिशय सुंदर व देखणा कार्यक्रम लायन्स क्लब अक्कलकोटनी आयोजित केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button