जिजाऊ माते सारखी आज आई झाली तर छ.शिवरायांसारखे मुले घडतील -रेखा बनसोडे

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )
आजची आई उपवास नवस पुजा अर्चा या साऱ्या अंधश्रद्धेत वावरतात आणि त्यांची मुले व्यसनी आळशी बनत चालले आहेत हे विदारक दृश्य थांबवायचे असेल तर आजच्या आईनी राजमाता जिजाऊचा आदर्श आपल्यापुढे ठेवून डोळसपणाने पुढे जाणे गरजेचे आहे कारण जिजाऊमाता या दूरदृष्टीच्या होत्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले आपणही जिजाऊ मातेसारखी आई व्हावी तरच आपले मुले छत्रपती शिवरायासारखे घडतील असे मत काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा सरचिटणीस रेखाताई बनसोडे यांनी आयोजित जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
नायगाव शहरात आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रेखाताई बनसोडे यांच्या हस्ते जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर सामूहिकरीत्या जिजाऊ वंदना घेण्यात आली. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना रेखाताई बनसोडे पुढे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यात सर्व प्रजा यांना सुखी समाधानी ठेवले होते पर स्त्रीचा सातत्याने त्यांनी सन्मान केले गोरगरीब लोकांना सढळ हाताने मदत करीत होते म्हणून त्यांना दानशूर राजा छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते कारण लहानपणापासूनच त्यांच्यावर मा जिजाऊचे संस्कार होते आपणही आपली मुले संस्कारित होण्यासाठी जिजाऊ मातेची प्रेरणा घ्यावी असे मार्मिक विचार रेखाताई बनसोडे यांनी उपस्थित महिलांना दिले. यावेळी सावित्रीबाई शेवाळकर, अहिल्याबाई कांबळे,चंद्राबाई गायकवाड,वैशाली अडकते, किरणबाई भालेराव, हनमाबाई कांबळे हेमाबाई कांबळे यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.