जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अधिनस्त सर्व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी देण्याच्या रासकम.संघटनेच्या मागणीला मंजुरी

सोलापूर: ( रमेश सुरवसे ) सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालये तसेच उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याप्रमाणे दुसरा व चौथ्या शनिवारची साप्ताहिक सुट्टी जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर कार्यालयातील प्रशासन आजपर्यंत देत नव्हते.अन्य जिल्ह्यामधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयीन अधिकारी व त्यांचे प्रशासन दुसरा व चौथा शनिवारची साप्ताहिक सुट्टी त्या त्या रुग्णालये आणि कार्यालयाच्या विभागामधील अत्यावश्यक सेवा आणि कामाची निकड पाहुन ती विचारात घेऊन दुसरा आणि चौथा शनिवार सुट्ट्या देत असतात.त्याच धर्तीवर सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील तसेच कार्यालयामधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक दुसरा व चौथा शनिवारची सुट्टी देण्यात यावी.अशी मागणी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हा शाखेचे जिल्हा नेते सी.एस.स्वामी यांच्या हस्ते तसेच बाळकृष्ण पुतळे आणि राजाभाऊ सोनकांबळे यांच्या उपस्थितीत तसेच राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर, रघुनाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.पी.कुलकर्णी यांच्या दालनात समक्ष भेटुन याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी प्रशासनांशी चर्चा करून व शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून योग्य ती सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.असे आश्वासन दिले.त्यांची पूर्तता मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलकर्णी यांनी आश्वासनाची पूर्तता करत संबंधित सर्व कार्यालयाने सदरच्या आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ कार्यवाही करण्याचे कार्यालयीन आदेश काढले आहेत. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आरोग्य शाखेचे अध्यक्ष प्रभाकर होनकळस, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सी.एस.स्वामी, युवा नेते बाळकृष्ण पुतळे तसेच कार्यकुशल लढाऊ नेते राजाभाऊ सोनकांबळे, सटवाजी होटकर , रघुनाथ बनसोडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे रासकम. संघटनेच्या वतीने विशेष आभार मानले आहे.यावेळी आरोग्य सेवेतील कर्मचारीही उपस्थित होते.