परंडा शहरात पालखी मार्गावरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु

कामाची पाहणी करताना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर
परंडा ( फारूक शेख ) शहरात पैठणचे संत एकनाथ महाराजांची पालखी रविवार दि २९ रोजी येत आहे. शहरातील जय भवानी चौक ते खासापुरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे . हे काम पालखी येण्या आधी रस्ता तयार व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगरसेवक संजय घाडगे , वसीम पठाण , नवाज शेख , प्रविण मिश्रा, ठेकेदार पैकीकर . रणदिवे गेली आठ दहा दिवसापासून दिवस रात्र यंत्रणा वाढवून युद्धपातळीवर काम करून घेत आहेत .
येणाऱ्या पालख्या दिंड्यातील भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी जय भवानी चौक ते खासापुरी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या काम सुरू आहे .हे काम पालखी येण्याआधी खोदलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून दबाइचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . पालखी दाखल होण्यापूर्वी रस्ता तयार होईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली . मात्र काही लोक उगीचच रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे भक्तांची गैरसोय होणार अशा तक्रारी करीत आहेत . मात्र भाविक भक्तांची गैरसोय होऊ देणार नसल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली .
या कामाची पाहणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मनीषा वडेपल्ली करून काम दर्जेदार व लवकर करण्याच्या सूचना ठेकेदार पैकीकर यांना दिल्या आहेत .