सामाजिक
हजरत शेख नुरोद्दीन बाबा दर्गा येथे पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड झाल्या बद्दल अक्कलकोट येथील सर्व धर्मियाचें श्रध्दास्थान असलेल्या हजरत शेख नुरोद्दीन बाबा दर्गा येथे सत्कार करताना दर्गा सज्जादानसिन यांचे बंधू अहमद पाशा पिरजादे यांच्या हस्ते कृपावस्त्र , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार नंदू जगदाळे , पत्रकार राजेश जगताप , सामाजिक कार्यकर्ते कमलाकांत होटकर , नागेंद्र ढाले , नागनाथ आयवळे , राजेंद्र पंडित , केशव भगत , स्वामीराव वाकडे, दर्गा मुजावर अशपाक मुजावर आदी उपस्थित होते. यावेळी अहमद पाशा पिरजादे व उपस्थितानी स्वामीराव गायकवाड यांचे अभिनंदन केले.