सामाजिक
पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल कामगार सेना शिवसेना शिंदे गटाकडून स्वामीराव गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथन हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर , अक्कलकोट कामगार सेना शहर महिला आघाडी प्रमुख जयश्री कोलाटी शेअर महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा शाल, पुष्पहार गुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पत्रकार नंदकुमार जगदाळे , पत्रकार राजेश जगताप , पत्रकार रमेश भंडारी आदी उपस्थित होते.
