सामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

-अक्कलकोट ( प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभाग ता.अक्कलकोट यांच्या वतीने आदर्श पत्रकार सन्मान सोहळा-२०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा लातूरच्या निरीक्षक सुवर्णा झाडे, जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी, शहर उपाध्यक्ष मीरा बुद्रुक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तद्नंतर उपस्थित सर्वच मान्यवरांचा फेटा बांधून, पुष्प देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सविता देडे व शहर उपप्रमुख हरीश देडे  यांनी सत्कार केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे या होत्या.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा  पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व लेखणी(पेन)देऊन पत्रकारांचा  सत्कार करण्यात आला. यामध्ये नंदकुमार जगदाळे,राजेश जगताप,स्वामीराव, गायकवाड, रमेश भंडारी,गणेश भालेराव , सिद्धार्थ भडकुंबे  आदी पत्रकार बांधवाचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी यांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे म्हणाल्या की, महिला तालुकाध्यक्षा सविता देडे व शहर उपप्रमुख हरीश देडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करून पक्षाचे कार्य व विचार वंचित,पीडित घटकापर्यंत पोहचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे विशेषतः महिला वर्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारचे नियोजन सध्या त्या करत आहेत.निश्चितच मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मी करेन असे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णराज महिला मंडळ ही दिनदर्शिका उपस्थित सर्व मान्यवरांना व पत्रकार बांधवांना भेट स्वरूपात देण्यात आले.यावेळी माजी सैनिक कमलाकर कांबळे , प्रकाश घटकांबळे,शंभूदेव सुरवसे, वजीर शेख , सज्जाद मणियार,  मीना भाकरे,जलवंता मठे शोभा तिखंडे, बोरगावच्या सरपंच विद्या स्वामी श्याम स्वामी, शरीफ निटोरे,महिला पत्रकार रेणुका वठारे,प्रसाद ठक्का आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार हरीश देडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button