सामाजिक
पद्मविभूषण माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांची ग्रेट भेट , माणुसकी फाउंडेशन अक्कलकोट 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) गोविंद बाग बंगला बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी माणुसकी फाउंडेशन अक्कलकोटच्या कार्याचे कौतुक करत शाबासकी दिली. त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांतून त्यांच्या चौफेर ज्ञान , माहिती आणि स्मरणशक्तीचा प्रत्यय आला. ही भेट ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार प्रेमी नरसिंहराव क्षिरसागर यांच्यामुळे झाली. यावेळी शरदचंद्र पवार यांनी नरसिंहराव क्षिरसागर व त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .यावेळी ज्येष्ठ नेते नरसिंहराव क्षिरसागर तसेच माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष अनंत क्षिरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे,सचिव आशिष हूंबे, बारामती मधील सहकारी महेश गावडे उपस्थित होते.माणुसकी फाउंडेशन अक्कलकोट 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.



