सामाजिक

समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध – आमदार प्रवीण दरेकर

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
दिनांक 21.1.2025 – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. अलीकडील काळात स्वामी भक्तांची संख्या वाढत चालली आहे. या कारणाने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत चालली असल्याचे आपणास समजले आहे. मंदिराच्या मर्यादित परिसरात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी उदात्त स्वामी सेवेच्या दिनक्रमाने स्वामी भक्तांच्या सेवेत नित्यपणे कार्यरत आहेत. हे ऐकून खूप समाधान झाले. गर्दी कितीही असू द्या त्यांचे वैविध्यपूर्ण नियोजन हे मंदिर समितीचे ठळक वैशिष्ट्य आहे. प्रसंगास अनुसरून निर्णय घेण्याची क्षमता महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे, म्हणून वटवृक्ष मंदिरातील गर्दीच्या कालावधीतही महेश इंगळे यांचे वटवृक्ष मंदिरातील नियोजन उत्तम व शिस्तबद्ध असते. मी ही एक निस्सीम स्वामीभक्त असल्याने अशा बाबींकडे कटाक्षाने वैयक्तिक लक्ष देत असतो, म्हणून स्वामी समर्थांवरील श्रद्धेय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे मनोगत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, भारतीय जनता पार्टी विधान परिषदेचे आमदार, तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आज सहकुटुंब भेट देऊन अत्यंत विनम्रभावे मंदिर परिसराची पाहणी करत व मंदिरातील भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधांबद्दल  समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्याकडून जाणून घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार प्रवीण दरेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार दरेकर बोलत होते. पुढे बोलताना आमदार दरेकर यांनी महेश इंगळे यांच्या स्वामी सेवेच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, कापसे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, अभिजीत लोकापुरे, प्रथमेश इंगळे, अतिश पवार, छोटू पवार, डांगे, राठोड,  प्रवीण देशमुख, ननू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button