Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सर्जेराव जाधव ट्रस्टमार्फत उपेक्षितांना आधार देण्याचे कार्य

Admin by Admin
December 28, 2024
in सामाजिक
0
सर्जेराव जाधव ट्रस्टमार्फत उपेक्षितांना आधार देण्याचे कार्य
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
१०५ व्या जयंतीनिमित्त 
अक्कलकोटमध्ये कार्यक्रम
अक्कलकोट, ( प्रतिनिधी ): समाजात गरीब 
आणि श्रीमंताची दरी वाढलेली असली तरी खऱ्या अर्थाने दीन- दलित उपेक्षितांना 
आधार देण्याचे महान कार्य सर्जेराव जाधव 
चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. आजच्या युगात अशी माणसे दुर्मिळ आहेत.खऱ्या अर्थाने निराधारांना आधार देण्याचे त्यांचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे,असे प्रतिपादन प्रा.डॉ.यशपाल खेडकर (पंढरपूर ) यांनी केले.बुधवारी,अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात ऍड.जाधव यांच्या १०५ 
व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे 
आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 
संस्थेचे अध्यक्ष ऍड.शरदराव जाधव-फुटाणे
हे होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी रमाकांत डाके व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.खेडकर म्हणाले,हल्ली समाजात समाजसेवा करण्याचे काम खूप कमी झाले आहे असे असताना सर्जेराव जाधव यांनी अक्कलकोट शहर 
आणि तालुक्यासाठी हा ट्रस्ट रुपी यज्ञ सुरू  केला आहे आणि हे रोपटे आज वाढून त्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले पाहायला 
मिळत आहे.खरोखर ज्यांना मदतीची गरज आहे.त्यांना आजकाल मदत मिळत नाही. अनेक ठिकाणी समाज कार्य करत असताना इव्हेंट बाजी होते.पण ट्रस्ट मार्फत खरोखर गरिबांना मदत दिली जाते.या कार्याची 
बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही.या 
संस्थेचे अध्यक्ष ऍड.शरदराव फुटाणे –
जाधव हे देखील तितक्याच प्रामाणिकपणे हे कार्य पुढे नेत आहेत.हे ऐकून खूप कौतुक वाटले.मुख्याधिकारी डाके म्हणाले,आपल्या पश्चातही हे कार्य निरंतरपणे चालू रहावे यासाठी खास ट्रस्टची स्थापना केली आणि
पुढे हे कार्य संस्थेच्या विश्वस्तांमार्फत 
अखंडपणे सुरू आहे. खर्चाला मर्यादा 
असली तरी त्यांचे कार्य व्यापक स्वरूपाचे 
आहे.अध्यक्षस्थानावरून बोलताना 
ऍड.फुटाणे -जाधव म्हणाले,जो विचार 
सर्जेराव जाधव यांचा होता तोच विचार 
एक दिलाने आम्ही पुढे नेत आहोत.या विचारावर गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेची वाटचाल सुरू आहे यात आम्ही कधीही 
खंड पडू दिला नाही. प्रास्ताविकात विश्वस्त सुरेश फडतरे यांनी संस्थेच्या कार्याचा झालेला विस्तार सांगून संस्थेची ध्येय धोरणे आणि आचारसंहिता सांगितली.व्यासपीठावर फत्तेसिंह संस्थेचे अध्यक्ष राजीव माने,उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विश्वस्त संतोष फुटाणे – जाधव,शिवाजीराव पाटील,अमर 
शिंदे,सुरेशचंद्र सूर्यवंशी,स्वामीराव पाटील,प्रा.भीमराव साठे,बाबा निंबाळकर,
सुधाकर गोंडाळ,अंबणप्पा भंगे,राचप्पा वागदरे,प्रभाकर मजगे,इसहाक पटेल आदींची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन,मान्यवरांचा सत्कार,तालुक्यातील गोर गरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय,शैक्षणिक आर्थिक मदतीचे धनादेश 
व गरिबांना चादर वाटप आदी कार्यक्रम पार पडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विश्वस्त शंकरराव पवार यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनराव चव्हाण यांनी केले.
तर आभार संतोष जाधव यांनी मानले.
Previous Post

माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन

Next Post

माजी उपनगराध्यक्ष नागराज माशाळे यांचे निधन 

Admin

Admin

Next Post
माजी उपनगराध्यक्ष नागराज माशाळे यांचे निधन 

माजी उपनगराध्यक्ष नागराज माशाळे यांचे निधन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697