Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांत नाराजी 

Admin by Admin
December 16, 2024
in टॉप न्यूज
0
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांत नाराजी 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय झालेले भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकात नाराजी पसरली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा आशेवर समर्थक होते. पण आमदार कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांचा हिरमोड झाला आहे.
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४९ हजार ५७२  इतक्या मताधिक्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विजय झाले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विजयामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मंत्री होण्याची चर्चा जोरदार रंगली होती. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आमदार सचिन कल्याणशेट्टी हे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे सहकारी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी असल्याने त्यांचा समावेश राज्याच्या मंत्रिमंडळात होईल अशी अपेक्षा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातून व्यक्त केले जात होते.राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. पण दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा समावेश न झाल्याने त्यांच्या समर्थकांतून व भाजपा कार्यकर्त्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपाने युवा नेतृत्वास जर संधी मिळाली असती तर सोलापूर जिल्ह्याच्या विकासास गती मिळाली असती अशा भावना समर्थकांत व्यक्त केल्या जात आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून आल्यानंतर मतदार संघात भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने आमदार समर्थक व कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक व भाजपा  कार्यकर्त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे.
Previous Post

परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण घुंगराळा कडकडीत बंद 

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याबद्दल अमित शहांनी माफी मागावी,  काँग्रेसची मागणी

Admin

Admin

Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याबद्दल अमित शहांनी माफी मागावी,  काँग्रेसची मागणी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याबद्दल अमित शहांनी माफी मागावी,  काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697