महाराष्ट्र

सकल हिंदू समाज तालुका नायगावच्या वतीने बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान मोदी यांना निवेदन सादर.

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )10 डिसेंबर 2024 रोजी नायगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात होत असलेल्या हिंदू अत्याचार आणि हिंदू मंदिरावर होणारे हल्ले गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश व देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानव अधिकार मालमत्ता आणि जीवाचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे. बांगलादेशात गेल्या काही महिन्यामध्ये हिंदू मंदिरावर झालेले हल्ले. तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबलावृद्ध आणि महिलावर झालेले अमानविय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ .ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकाराचे हानन करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी  पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ कारवाई करावी व अशा कारवाईस आम्ही भारताचे हिंदू म्हणून आपल्या सोबत ठामपणे उभे राहण्याचे निवेदन दि 10 डिसेंबर रोजी आम्ही नायगाव तहसीलदारा मार्फत अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाज तालुका नायगावच्या वतीने कैलास पाटील शिंदे. नागेश मोरचोंडे. माधव पाटील कल्याण. प्रवीण शिंदे. गणेश शिंदे. पुरुषोत्तम जाधव. शेषराव लाब्दे.गजानन स्वामी. वैभव देशमुख. मेघा डोगंळे. संदीप मारवाडी. सचिन कुष्णुरे. गुरुनाथ चव्हाण. योगेश बामणे. देविदास तमनबोईनवाड. शिवलिंग पुटेवाड. साईनाथ वंगरवार. गणेश मामीडवार. अविनाश चव्हाण. पृथ्वीराज जाधव.कृष्णा मनुरे. संभाजी खडके.चंद्रकांत कदम. गजानन शिरडकर. संतोष कावडे. गणेश कंधारकर.गजानन भालेराव .विजय मुटकुलवार. या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आले असून सदर या हिंदुत्ववादी मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नायगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button