Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे ती संपणार नाही – खासदार विशाल पाटील

Admin by Admin
June 27, 2025
in राजकीय
0
काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे ती संपणार नाही – खासदार विशाल पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोटात काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा संपन्न

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )  काँग्रेस पक्षातून कोणी गेला तरी काँग्रेस पक्ष संपणार नाही. अक्कलकोट तालुका हा काँग्रेस पक्षाला मानणारा तालुका आहे. काँग्रेस पक्षाच्या विचाराचे ठिकाण आहे. सर्व समाजाला जाती-धर्मांना घेऊन चालणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची ताकद ही विचारात आहे काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे ती संपणार नाही असे प्रतिपादन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केले.
 अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक मंगल कार्यालयात गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी खासदार विशाल पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील , सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे , अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील ,काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष एडवोकेट नंदकुमार पवार , काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक बळूर्गी , अरुण जाधव , माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा , जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेता शिवानंद बिराजदार , बसवराज बाणेगाव , एडवोकेट संजय गायकवाड , अशोक देवकते ,महांतेश्वर पाटील , नितीन ननवरे , गोकुळचे संचालक प्रकाश पाटील , सैपन फुलारी , काका पाटील ,समाधान होटकर , मुनाफ दिवटे ,माजी नगरसेवक सुनील खवळे , शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुकानुरे , हर्षदीप गायकवाड , राजू वाघमारे , सातलिंग शटगार, मल्लिनाथ भासगी, मल्लिकार्जुन हत्ते आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले , अक्कलकोट तालुक्याशी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची नाळ जोडली गेली आहे. माजी आमदार स्वर्गीय महादेव पाटील , माजी शिक्षण राज्यमंत्री स्वर्गीय पार्वतीबाई मलगोंडा यांच्याशी वसंत दादा पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सध्या महाराष्ट्रात लुटण्याचे काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. महाराष्ट्राला लाचार बनविण्यात आले आहे. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आपण संपतो की काय या भीतीने भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मी काँग्रेस विचारधारेचा असून सांगलीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो पण काँग्रेस पक्ष सोडला नाही .काँग्रेस ही विचारधारा आहे ती संपणार नाही. नेते येतील जातील विचारधारा कायम राहते धर्म सांगून सध्याचे राज्यकर्ते खिसे भरत आहेत .दिल्लीत सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे पुढील काळात दिसणार आहेत .काँग्रेस पक्षात युवकांना संधी द्या या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला काहीच कमी पडू देणार नाही. एक मोठी ताकद देऊ असे खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील अशपाक बळोर्गी आदींच्या हस्ते करण्यात आला.या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या युवक तालुका अध्यक्षपदी विशाल कवडे , भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तालुकाध्यक्षपदी भीमराव जिडगे शहराध्यक्षपदी विलास राठोड अल्पसंख्यांक सेल विभागाच्या तालुकाध्यक्षपदी मौलाली पठाण (बोरगाव )अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्षपदी शिवशरण करजगी आदींची निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यास लाळसंगी , फारुख बबरची महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा  अनिता दुपारगुडे , तुकाराम दुपारगुडे  आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्षातून शिवसेना शिंदे गटात गेल्याने या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याकडे अक्कलकोट तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले होते.
कोण काय म्हणाले –
सतेज उर्फ बंटी पाटील – काँग्रेस पक्षातून कोण गेले यापेक्षा कोण राहिले हे महत्त्वाचे आहे. अनेकांनी घरी बदलण्याचे काम केले आहे. मागील चार-पाच वर्षात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रमाण वाढले आहे .देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागे सर्वसामान्य जनता ताठ मानेने उभी आहे.काँग्रेस पक्षाची खरी ताकद ही स्वाभिमानी जनता आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना  तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. ते व्यक्तिमत्व सोडून गेले याचे दुःख त्यांना होत आहे. मल्लिकार्जून पाटील यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचा सूर्य उगवला आहे. संघर्ष असतो चिंता करू नका. खासदार प्रणिती शिंदे तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. अक्कलकोटचे आमदार अक्कलकोट शहराला सुरळीत पाणीपुरवठा देण्याचे काम करत आहेत का? निवडणुकीत त्यांना जाब विचारा. शेतकरी प्रश्नावर किती वेळा त्याने विधानसभेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला. समाजामध्ये तेढ निर्माण केले जात आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवणूक आपणाला मिळाली आहे .दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे .गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने अनेक योजना शेतकरी गोरगरीब जनतेला दिलेले आहेत. अक्कलकोट तालुका हा स्वाभिमानी आहे हे दाखवून द्या. अक्कलकोट तालुका काँग्रेसचा आहे हे दाखवून द्या .मल्लिकार्जुन पाटील यांनी आता पुढे येऊन हा लढा उभा करावा. आम्ही आपल्या मदतीला धावून येऊ. कोल्हापूरचे व सांगलीचे पाटील एका रात्रीत आपल्या मदतीला येतील. संकट काळात तुम्ही उभे आहात .एकेक कार्यकर्ता जमा करण्याचे काम करा. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार करावा लागेल. खासदार प्रणितीताई शिंदे या लहान बहिणी सारखे आहेत. काँग्रेस पक्षात वजन असणाऱ्या नेते आहेत. दिल्लीपर्यंत स्वाभिमान टिकवा .स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १०० % काँग्रेस पक्षाची ताकद दाखवा.
खासदार प्रणिती शिंदे -लोकसभा व विधानसभा  निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील  मतदारांनी काँग्रेस पक्षावर प्रेम केले आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बाबत माझ्या मनात आदर आहे .काँग्रेस पक्ष ही एक ताकद आहे ती कधीच संपणार नाही. काँग्रेस पक्षाला परंपरा विचारधारा संस्कार तत्व यांची मोठी देणगी आहे . आमचे संस्कार जमिनीशी निगडित आहेत .काँग्रेस पक्ष ही विचारधारा आहे काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले संविधान दिले .सध्याचे केंद्रातील मोदी सरकार हे  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रॅम्प  समोर झुकले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोदी सरकारने देशातील सेनेला  कमकुवत बनविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सतर्क रहा .अक्कलकोट तालुक्यात निवडणुकीच्या वेळी विकत घेण्याचा प्रयत्न अक्कलकोट येथे झाला आहे. आम्ही लोकांसोबत चालणारे नेते आहोत. काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. माणूस हा पक्षामुळे मोठा होतो. मल्लिकार्जुन पाटील डॉक्टर सुवर्णा मलगोंडा अशपाक बळवर्गी हे तत्त्वाशी ठाम आहेत. सध्याच्या राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही .तीन तिघाडी काम बिघाडी असे हे सरकार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार हे निगरगट्ट असून शेतकरी कर्जमाफी बद्दल बोलायला तयार नाहीत.
डॉ. सुवर्णा मलगोंडा – – तालुक्यात पंधरा दिवसात राजकीय घडामोडी घडल्या. खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने लक्ष घातले. खासदार प्रणिती शिंदे यांनी पूर्ण ताकद तुमच्या मागे लावणार असा शब्द आम्हाला दिला .तालुक्याला जास्त वेळ देण्याचा शब्द खासदार प्रणिती  शिंदे यांनी दिला आहे. भाजपाचा घोषणांचा पाऊस सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यात पाणीदार आमदार म्हणून सर्वत्र बॅनर लागत आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. ऑनलाईन अर्ज भरून शेतकरी हे थकले आहेत. शेतकऱ्यांचे उसाचे बिल तीन वर्षापासून मिळाले नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.   ट्रामा केअर सेंटर चे उद्घाटन झाले पण तिथे तज्ञ डॉक्टर नाहीत यामुळे  ट्रामा केअर सेंटर हे बंद आहे .जनकल्याणाच्या कामाकडे भाजपाचे लक्ष नाही. व्यक्ति पेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे हे आजच्या मेळाव्यावरून सिद्ध झाले आहे. व्यक्तीवर पक्ष चालत नाही काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे.
अश्पाक बळोरगी – – माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडत असताना आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आमची चेष्टा करण्यात आली.  साडेतीन लोक असलेला लोकांचा पक्ष अशी टीका झाली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खंबीरपणे लढा मी आपणास सोबत आहे असे सांगितले. ग्रामीण भागात आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे .आम्ही ग्रामीण भागामध्ये दौरा करत असताना सर्वसामान्य जनतेचे मोठे समर्थन मिळाले. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे .सध्या अक्कलकोट येथे गलिच्छ राजकारण सुरू असून मुस्लिम बांधवांच्या विरोधात राजकारण सुरू आहे .परवाच भाजपाच्या आमदाराने मोर्चा काढून मुस्लिम समाजावर गलिच्छ शब्दात टीका केली आहे .दोन हिंदुत्ववादी पक्ष लढले तर काँग्रेस पक्षाचा विजय नक्कीच होणार याची धस्ती सध्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी  घेतला आहे. त्यामुळेच ते धर्मवादी राजकारण करत आहेत. अक्कलकोटला  तीर्थक्षेत्र आम्हीच जाहीर करून आणले आहे.
मल्लिकार्जून पाटील – -काँग्रेसची विचारधारा ही महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्ष विचारधारा मानणारा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष आहे .भाजपा हा जाती धर्मामध्ये तेढ  निर्माण करत आहे. काँग्रेसची विचारधारा ही दिन दलितांची विकासाची विचारधारा आहे. तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम करू. सध्या महाराष्ट्रात व देशात  धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असून त्याचे लोण आता अक्कलकोट मध्ये आलेले आहे. सर्वधर्मसमभावाची विचारधारा घेऊन आम्ही चाललो आहोत भविष्यात आमच्या मागे उभे रहा.
Previous Post

महत्वाच्या बातम्या

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697