टॉप न्यूज
महत्वाच्या बातम्या

▪️ इयत्ता पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा
▪️ पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापणार, 30 जून ते 18 जुलैपर्यंत अधिवेशन
▪️ किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली; मंत्री महोदय ईडीतून सहीसलामत सुटले
▪️ मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
▪️ हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा कलाकारांसह राजकीय नेत्यांनाही निर्वाणीचा इशारा; मोर्चात ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा
▪️ मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा
▪️ हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूचं स्टेटमेंट चुकीचं नाही; शरद पवारांचं भाष्य, आधी त्यांच्याकडून विचारणा होऊ द्या, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही, मोर्चातील सहभागावर पवारांची भूमिका
▪️ राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज
▪️ मुंबईत वर्षातील सर्वात उंच भरती आज; दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा उसळल्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, पुढील 5 दिवस पालिकेकडून अलर्ट
▪️ इराणला धमकीवर धमकी, शक्तीशाली बॉम्बही टाकला अन् आता त्याच इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले इराणने युद्धात शौर्य दाखवले.