Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सातारा येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

Admin by Admin
June 26, 2025
in महाराष्ट्र
0
सातारा येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशाने सातारा जिल्ह्यात पक्षाचे युवा नेतृत्व बिपिन कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व भव्य कार्यकर्ता मेळावा सोहळा पार पडला.
यावेळी युवा नेतृत्व बिपिन कटारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भव्य शक्तीप्रदर्शन रॅलीचे आयोजन केले होते त्यानंतर समस्त युवक महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.
मेळाव्या प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी स्वप्निल  रोकडे यांची निवड तर
खंडाळा तालुका अध्यक्षपदी समीर पवार यांची निवड बिपिन कटारे यांनी जाहीर करून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र प्रदान केले.
बिपिन कटारे यांनी मार्गदर्शन करता सांगितले की, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे त्याच अनुषंगाने दररोज मोठ्या प्रमाणात युवक महिला युवती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे राज्यातील जिल्हा तालुका शहर व ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष
“समाज जोडो अभियान”
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी,आम्ही रिपब्लिकन ,युवा जोडो अभियान या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क साधून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे.वाढत चाललेल्या अन्याय अत्याचारा विरोधात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सातत्याने मैदानात असतो.बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला असून लवकरच रोजगार परिषद राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.
या मेळाव्या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्कप्रमुख सचिन  नांगरे, महाराष्ट्र राज्य सचिव आर.बी.जगताप, युवा नेते नंदुरबार जिल्हा अध्यक्ष दीपक  भालेराव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्या प्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष स्वप्नील  रोकडे, खंडाळा तालुका अध्यक्ष समीर  पवार, भोर तालुका अध्यक्ष सागर  यादव, पुणे युवा नेते प्रकाश ओहळ, खंडाळा तालुका उपाध्यक्ष आदित्य बोडरे, उपाध्यक्ष स्वप्निल मंडले, उपाध्यक्ष प्रमोद कदम, उपाध्यक्ष सुरज चव्हाण, खंडाळा तालुका सचिव सागर क्षेंडकर,सह सचिव हेमंत पवार,संघटक अभिषेक पवार,सह संघटक निलेश कदम,सदस्य निलेश चव्हाण, साईनाथ नागरगोजे, विक्रम चव्हाण, योगेश खोमणे,आकाश बडगुडे,राहुल बोबडे,संकेत मानकर,प्रतीक तळेकर,समीर दुधाणे,श्रेयस मदने,मोरे
आदी पदाधिकारी कार्यकर्ते महिला बहु संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सकाळच्या घडामोडी

Next Post

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जनहित शेतकरी संघटनेचे साखर कारखानदाराच्यां मनमानी विरोधात निवेदन

Admin

Admin

Next Post
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जनहित शेतकरी संघटनेचे साखर कारखानदाराच्यां मनमानी विरोधात निवेदन

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जनहित शेतकरी संघटनेचे साखर कारखानदाराच्यां मनमानी विरोधात निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697