सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जनहित शेतकरी संघटनेचे साखर कारखानदाराच्यां मनमानी विरोधात निवेदन

सोलापूर ( रमेश सुरवसे )नुतन आमदार अभिजीत पाटील व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी २०२४ – २५ च्या गळीत हंगामापूर्वीजाहीर केलेले ३५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत व इतर कारखान्यानी थकीत उसाची बिले जमा करावीत या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सहकुटुंब पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी व ग्राम स्वच्छता अभियान व इतर शासकीय कामासाठी पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांची पंढरपूर येथे विश्रामगृहावरती प्रत्यक्ष भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ साखर कारखाना सहकार शिरोमणी भैरवनाथ सिद्धनाथ भीमा सहकारी साखर कारखाना यांनी ऊस उत्पादकाची एफ आर पी ची थकीत बिले दिली नाहीत .तसेच नूतन आमदार अभिजीत पाटील व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले ३५०० रुपये पैकी २८०० रुपये जमा केलेत .परंतु अद्याप ७०० रुपये फरक जमा केला नाही तो त्वरित जमा करावा. तसेच सोलापूर जिल्हा बरोबर महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदार कष्टकरी कामगारांच्या पगारी १० महिने २० महिने देत नाहीत व ऊस वाहतुकीचे भाडे वेळेवर मिळत नाही. त्यासाठी शासनाने कडक कायदा करावा या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून दिले. यावेळी सहकार मंत्र्यांशी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले बऱ्याचश्या साखर कारखान्याचे कामगारांच्या घरातील मुलं त्यांची पत्नी अक्षरशा मजुरी करून आपली उपजीविका भागवत आहेत .कामगार नोकरीचे भीतीने चेअरमनला बोलू शकत नाहीत. हा वनवास कामगारांचा संपवावा आणि बरेचसे कारखानदार नियमाप्रमाणे थकीत उसाच्या बिलाची रक्कम १५ टक्के ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत नाहीत. याच्यावरती आपण जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना कामगारांना व ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक सुरेश नवले नितीन काळे शिवाजी घाडगे नाना मोरे मोहन जमदाडे औदुंबर बापू गायकवाड निसार पाटील रामभाऊ काटे पाटील चंदू निकम अजिंक्य देशमुख रवींद्र मुठाळ सुभाष पवार धर्मराज पुजारी सुनील पुजारी उपस्थित होते.