Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Admin by Admin
June 27, 2025
in टॉप न्यूज
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
        १९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (प.ट्र.नं.एफ-२२७९), अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदरची पत्रकार परिषद अन्नछत्र मंडळात संपन्न झाली.
       दि. ३० जून रोजी सोमवार सायंकाळी ६.३० मिनीटानी कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, प.पू.श्री मोहन पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट, तहसिलदार विनायक मगर, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमाचे पूजन, दिप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 
दि. ३० जून रोजी सोमवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत नक्षत्रांचे देणे, थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. 
दि. १ जुलै रोजी मंगळवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत, आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडियेला’ खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम होणार आहे. 
दि. २ जुलै रोजी बुधवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत, मधुरा इव्हेंट प्रस्तुत ‘रागा-अनुरागा’ कन्नड चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते- ख्यातनाम कन्नड गायिका अनुराधा भट व झी कन्नड वाहिनीचे प्रसिद्ध निवेदिका अनुश्री व सहकारी बेंगलुरु यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. 
दि. ३ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘बेला शेंडे संगीत रंजनी’ भावगीते, चित्रपटगीते व भक्तीगीते, सादरकर्ते – ख्यातनाम मराठी गायिका बेला शेंडे आणि सहकारी, मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.  
दि. ४ जुलै रोजी शुक्रवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान सादर होणार आहे.
दि. ५ जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे. 
दि. ६ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत महाराष्ट्राचे हास्य जत्रा सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, अरुण कदम, विनता खरात, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, प्रभाकर मोरे, शिवाली परब यांचा धमाल उडवणारा कार्यक्रम होणार आहे. 
दि. ७ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘शरण-गुरु-चरण’ नृत्यशैलीमधून गुरुवंदन सादरकर्ते- गुरु आभा वांबूरकर, गुरु स्मिता महाजन आणि शिष्यवर्ग, पुणे  यांचा कार्यक्रम होणार आहे.  
दि. ८ जुलै रोजी मंगळवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वामिनी प्रस्तुत, ‘रंजनी गंधा’ मराठी व हिंदी गितांचा कार्यक्रम सादरकर्ते- संदिप पाटील आणि सहकारी, पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.  
दि. ९ जुलै रोजी बुधवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. 
दि. १० जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त गुरुवार सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र  सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे. यांच्या हस्ते-खासदार- श्रीरंग बारणे, मावळ पुणे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शिवाजीराव फुंदे, स्वामीभक्त, मुंबई, ह.भ.प. गंजीधर महाराज, नागेश्वर संस्थान, पळसखेडा-मुर्तड, ता. भोकरदन, जि. जालना, महेश गावस्कर, सी .ए. पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, प्रभाकर शिंदे सन्मा. देणगीदार, छत्रपती संभाजीनगर, (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

चौकट : 
एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर :
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या  देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे. सध्या गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या ३ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.
         दि. १० जुलै रोजी गुरुवार सकाळी ११  ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ संदिप खर्डेकर- महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा, अध्यक्ष- उद्यम विकास सह. बँक, विश्वस्त- कर्वे समाज सेवा संस्था पुणे, राहुल वाळंज -अध्यक्ष सह्याद्री क्रिडा मंडळ (न्यास) टिळक नगर चेंबूर, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, सोलापूर, अॅड. नितीन हबीब- कायदेशीर सल्लगार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व जेष्ठ विधिज्ञ यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.   
        दि. ३० जून ते १० जुलै पर्यंत ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व निवेदन श्वेता हुल्ले या करणार आहेत. तरी सदरच्या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्रासह, कर्नाटक  आणि अन्य राज्य व परदेशातील स्वामी भक्तांनी घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे. यंदाच्या वर्षी सदरचे कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे हे २६ वे वर्ष आहे. 
        सध्या आषाढी वारी निमित्त दररोज हजारों स्वामी भक्त अन्नछत्र मंडळात येत आहेत. उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. यात्री निवास, यात्री भवन, प्रशस्त वहानतळ स्वामी भक्तांनी गजबजलेले व फुलून गेले आहेत.
        
चौकट : –
गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार : 
दि. ३० जून ते ९ जुलै दरम्यान गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व सत्कार हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 या पत्रकार परिषदेस मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, मनोज निकम, अनिकेत सोनटक्के  व न्यासाचे विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते हे उपस्थित होते. 
Previous Post

काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे ती संपणार नाही – खासदार विशाल पाटील

Next Post

हिंदी सक्तीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार

Admin

Admin

Next Post
हिंदी सक्तीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार

हिंदी सक्तीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697