सामाजिक
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी. बी. खेडगी शिक्षण संकुल परिसरात विविध प्रकारच्या सुमारे २४१ वृक्षारोपण

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, यात शंकाच नाही. पण, वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी. बी. खेडगी शिक्षण संकुल परिसरात विविध प्रकारच्या सुमारे २४१ वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे वृक्षारोपणा सोबतच विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला.
सदरच्या वृक्षारोपणाचा शुभारंभ उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, श्री बसवलिंग महास्वामीजी, श्री अभिनव शिवलिंग महास्वामीजी, श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी, श्री प्रभूशांत महास्वामीजी, तहसीलदार विनायक मगर, माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणेसह सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, मुख्य समन्वयक डॉ. गणपतराव कलशेट्टी उपस्थित होते.
वृक्ष संवर्धनासाठी जीवशास्त्र आणि वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेत प्रत्येक विद्यार्थी एक-एक वृक्षाची देखभाल पालनपोषण करेल, असा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियान राबविण्यात आले.
मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच. पण, त्यासोबत त्याचे संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील. वृक्षारोपणा सोबतच विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहन श्री पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकने यांनी विद्यार्थ्यांना केले.
खास विद्यार्थ्यांसाठी या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिध्दार्थ मुरुमकर व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदिनी केले.