राजकीय

माजलगावच्या विकासासाठी आ. प्रकाश सोळंके यांचा मंत्रिमंडळात समावेश करा शहर उपाध्यक्ष अजिंक्य वाघमारे यांची मागणी

 

माजलगाव ( प्रतिनिधी )
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा माजलगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी माजलगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य वाघमारे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुक झाली असुन माजलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. मागील पस्तीस वर्षांमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठ्या प्रमाणात विवीध विकासकामे करून मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे. माजलगाव मध्ये अनेक विकासकामे मार्गी लागली आहे मतदारसंघातील जलसिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी आज समृध्द झाला आहे. त्याचबरोबर माजलगावसह अन्य ठिकाणी एमआयडीसीचे का प्रगतीपथावर असुन याठिकाणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगाराची सोय उपलब्ध झाली आहे. या विकासाकामांच्या जोरावरच मतदारसंघातील जनतेने आ.सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघात निवडुण दिले आहे. आ.सोळंके यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा यांसाठी माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजलगाव शहर उपाध्यक्ष अजिंक्य वाघमारे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button