बिबट्याचा बंदोबस्त करा राहुल मोटे यांची तहसिलदार यांच्याकडे मागणी

परंडा ( फारुक शेख )
परंडा तालुक्यात मागील १५ ते २० दिवसापासुन बिबट्याचा वावर असुन, अनेक जनावरांची जिवीतहानी झालेली आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करून व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २ डिसेंबर रोजी परंडा तहसीलदार व वनविभाग यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
की, परंडा तालुक्यात मागील काही दिवसापासुन बिबट्याचा वावर होत असुन, सदर बिबट्याने अनेक शेतक-यांची जनावरे खाल्याने त्याचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच शेतकरी, शेतमजुर, लहान मुले यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर बिबट्यांच्या वावरामुळे मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता निर्माण झालेली
आहे. तसेच बिबट्या एक नसुन, ते जास्त प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी आपण बाहेरून एक्सपर्ट टिम मागवुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा व ज्या शेतक-यांची जनावरांची जिवीतहानी झालेली आहे त्या शेतक- यांना तात्काळ झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी
व लाईटचे टायमिंग दिवसा लोड शटींग करू नका अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार राहुल मोटे नसीर शहाबर्फीवाले राहुल बनसोडे, श्रीहरी नाईकवाडी, खय्युम तुटके , अँड संदिप पाटील, नंदू शिंदे, डॉ. रविन्द्र जगताप अँड. सुभाष वेताळ, अमोल जगताप , पिंटू कोकाटे, लक्ष्मीकांत बनसोडे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पन्नास पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


