शैक्षणिक

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा 

अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सुरेखा कल्याणशेट्टी माध्य.व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडी सह पालखी व रिंगण सोहळा पार पाडला. 
       प्रथम पालखीसह विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, सेमी विभागाचे प्रमुख रूपाली शहा व ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन मसुती, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,  हे उपस्थित होते. 
     यावेळी माध्यमिक मराठी विभागाची संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, माध्यमिक सेमी इंग्रजी विभागाची संत तुकाराम महाराज पालखी व कनिष्ठ महाविद्यालयाची संत गजानन महाराज पालखी अशा तीन दिशाकडून तीन पालख्या विद्यार्थ्यांनी सवाद्य टाळ, मृदंगाच्या तालात, विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या मैदानावर एकत्रित घेऊन आल्या. यावेळी दिंडीत पारंपारिक वेशभूषेत  शिक्षकांसह, मुले आणि मुली सहभागी झाले होते. मुली व शिक्षिका नऊवारी साडीत आणि  मुले व शिक्षक नेहरू शर्ट,विजार व टोपी आणि सर्वजण कपाळावर गंध लावले होते. त्यामुळे दिंड्या, पताके, पालख्या, वारकरी वेशभूषेतील हा सोहळा पाहून जणू शाळेत पंढरीच अवतरली की काय असा भास होत होता. विठ्ठल नामाचा जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमला होता. 
     अतिशय नयनरम्य असा दिंडी व रिंगण सोहळा पार पडला. यानंतर मुला मुलींनी फुगडी, भावगीत, भक्ती गीत व पारंपरिक नृत्य सादर केले. यात विद्यार्थी शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना स्वामी व दिगंबर जगताप यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण व व्हिडिओ सागर मठदेवरू, विद्या बिराजदार, बालाजी कांबळे व शितल टिंगरे यानी केले तर उपस्थितांचे आभार निशिगंधा सोमेश्वर यानी मानले. 
या कार्यक्रमास प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेमी विभागाचे दिगंबर जगताप, सेवानिवृत्त माजी शिक्षक खंडेराव घाटगे, पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, रविकिरण दंतकाळे, सिद्रामप्पा पाटील, कुमार जाधव, सलोनी शहा, शितल झिंगाडे, आदी शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button