तोळणूर गणातील भाजपा उमेदवार सविता सोलंकर यांचा होम टू होम प्रचार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत तोळणूर पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सविता रमेश सोलंकर यांनी डोर टू डोर प्रचार करत मतदारांची भेट घेतली आहे .तोळणूर पंचायत समिती गणातून भाजपातर्फे सविता रमेश सोलंकर यांना उमेदवारी देण्यात आले आहे. भाजपा उमेदवार सविता सोलंकर यांनी तोळणूर पंचायत समिती गणातील कल्लप्पावाडी , सातनदुधनी , तोळनूर ,उडगी, हैदरा येथे प्रत्यक्ष मतदारांशी भेट घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले आहे. सातनदुधनीतील भाजपाचे कार्यकर्ते रमेश सोलंकर यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माझ्यासारख्या गरीब उमेदवारास उमेदवारी दिली आहे. नागणसूर जि. प.मतदार संघातील विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाच्या उमेदवार सविता सोलंकर यांच्यासह नागणसूर गटातील सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या प्रचार फेरीत माजी सभापती महेश जानकर, माजी सरपंच विठ्ठलराव खताळ, दत्तात्रय कुंभार ,राजेश पांढरे , सोमनाथ जानकर, रतन राठोड ,नामदेव काळे, लिंबाजी राठोड , संजय पांढरे, सरपंच जयकुमार जानकर, दिलीप यमगार , तोळनूर चे माजी जिल्हा परिषद सदस्य चनबसया कौटगी, रमेश उप्पीन, राजशेखर पाटील, कल्याणी रब्बा , मलकाण्णा कोगनूर , मंजुनाथ तेली , नबी फुलारी, शकील मुजावर , हैदरा चेअरमन रफिक मुजावर , मराठवाडीचे पिंटू गायकवाड , ओंकारआप्पा हरकुड, धुंडूराज बनसोडे, गळोरगीचे काशिनाथ प्रचंडे , वाहिदपाशा शेख, बासलेगावचे लखन राठोड, जगदीश बिराजदार, संजय राठोड , फतेशा मुल्ला , लालडेशा जमादार, गुरववाडी चे माजी सरपंच बसवराज देवरमनी ,कल्याणी रावजी आदी उपस्थित होते.



