राजकीय

अक्कलकोट – भाजप विरोधात काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील भाजपाची वाढती ताकद रोखण्यासाठी काँग्रेस , शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची आघाडी झाली आहे. भाजपाविरोधात आता तिन्ही पक्षांची संयुक्त आघाडी झाल्याने भाजपा समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. अक्कलकोट तालुक्यात भाजपाची वाढलेली ताकद रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्षानी मोट बांधली आहे. भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढली जात आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना रोखण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवानंद पाटील यांनी एकत्र येत संयुक्तरीत्या निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत .भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकास ,पाणी प्रश्न यासह विविध विकास कामांना निधी मिळवून देण्याचे काम आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अक्कलकोट व मैंदर्गी नगर परिषदेत संपूर्ण बहुमतामध्ये सत्ता आणत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ताकद दाखवून दिली आहे. यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची क्रेज सध्या अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली जि .प व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत .भाजप संपूर्ण ताकतीने निवडणुकीच्या रिंगणात आहे .आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधकानी एकत्र येत संयुक्त आघाडी केली आहे. शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि प उपाध्यक्ष शिवानंद पाटील दिलीप पाटील संजीव कुमार पाटील आदींनी एकत्र येत संयुक्तरित्या जि प व पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. अक्कलकोट तालुक्यात एकाधिकारशाही वाढली असून विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे . आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा राजकीय वारू रोखण्यासाठी विरोधकात एकजूट झाल्याने तालुक्यातील जी.प व पंचायत समिती निवडणुकीतील लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टीसह  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , मल्लिकार्जुन पाटील , शिवानंद पाटील संजीवकुमार पाटील आदींनी मतदारसंघात प्रचार सभा घेऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. भाजपा सह काँग्रेस, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी आपल्या मतदारसंघात प्रचार फेरी काढून मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. वंचित बहुजन आघाडी , शिवसेना ठाकरे गट यांनी ही  जि प व पंचायत समिती मतदार संघात उमेदवार उभे केल्याने राजकीय रंगत वाढली आहे.
 चौकट – घराणेशाहीचा आरोप -भाजपा सह शिवसेना शिंदे गट, काँग्रेस पक्षाकडून आपल्याच घरातील लोकांना उमेदवारी दिल्याची चर्चा सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. चपळगाव जि प गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी , चपळगाव पंचायत समिती गणातून बंधू सागर कल्याणशेट्टी यांना भाजपाची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सलगर जि प गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे तसेच तोळणूर पंचायत समिती गणातून कन्या शितल म्हेत्रे यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी जेऊर गाणातून त्यांचे बंधू यांच्या पत्नी श्रुती पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नेते मंडळींनी आपल्या घरातील लोकांना पक्षाची उमेदवारी दिल्याने सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button