बावची विदयालय,परंडा. राजे शिवाजी पब्लिक स्कूल,परंडा वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे संविधान दिन मोठया उत्सहात संपन्न

परंडा ( फारुक शेख )परंडा येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी विदयालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन . अमोल रामचंद्र मोहिते (असि.कमिशनर GST आयकर विभाग भाईंदर ठाणे तथा डीवायएसपी पदी निवड.) हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदयालयाचे प्राचार्य .नारायण खैरे होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामान्यज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये देवकर संस्कृती, लटके श्रूतिका, नलवडे अक्षरा, करळे सिद्धी, करळे अनुष्का, मासाळ सई, गरदडे सानवी, गोरे अक्षरा, पठाण आलिया, कोकाटे प्रणव तसेच भूगोल विषयाच्या उपक्रमामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेले विदयार्थी बुलबुले संस्कार,माळी श्रद्धा, अनभुले जान्हवी, लिमकर आर्या, बुलबुले शौर्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. अमोल मोहिते यांनी संविधान दिनाविषयी नगरिकाची मुलभूत कर्तव्य व अधिकार, जीवन कसे जगावे या विषयी अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर नारायण खैरे यांनी कार्मक्रमाचे अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार . विकास वाघमारे यांनी केले. यावेळी विदयालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.