Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास – महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

Admin by Admin
November 18, 2024
in राजकीय
0
ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास  –  महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ): किल्लेदार मंगल कार्यालय ते नेहरू नगर बस स्टॉप पर्यंत निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सोमवारी (ता. १८) शहरात जोरदार पदयात्रा काढली. किल्लेदार मंगल कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे आसरा चौक, डी मार्ट, के एल इ समोरील मेन रोड, गोविंद श्री मंगल कार्यालय चौक, दावत चौक भारती विद्यापीठ संत रोहिदास चौक नेहरूनगर मार्गे नेहरूनगर बसस्टॉपवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 
या पदयात्रेदरम्यान, ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी महिलांनी महादेव कोगनुरे यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशिर्वाद दिले. गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पटके घालून हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब पदयात्रेचे चित्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. पदयात्रेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सर्वांना अभिवादन केले. अभिवादनासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले.
चौकट
मतदान यंत्रावर चार क्रमांकावर मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन हे चिन्ह मतदान यंत्रावर (ईव्हीएम) चार क्रमांकावर आहे. महादेव कोगनुरे यांचा फोटो आणि त्यापुढे रेल्वे इंजिनचे चिन्ह असून त्यासमोरील बटण दाबून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन पदयात्रेदरम्यान करण्यात आले.
चौकट
मतदारांचे प्रेम हीच विजयाची खात्री
यापूर्वीही शहरी आणि ग्रामीण भागात पदयात्रा, कॉर्नर सभा, गावभेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी शहरात झालेल्या पदयात्रेला ज्या पद्धतीची गर्दी होती त्यातून माझ्यावरचे मतदारांचे प्रेम दिसून येते. त्या प्रेमामुळेच मला विजयाची खात्री आहे अशी प्रतिक्रिया महादेव कोगनुरे यांनी दिली.

Previous Post

विकासासाठी पुनश्च एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना विजयी करा – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष  जे पी नड्डा

Next Post

तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या – सिद्रामप्पा पाटील

Admin

Admin

Next Post
तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या – सिद्रामप्पा पाटील

तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या - सिद्रामप्पा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156456
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697