महाराष्ट्र
वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

परतूर / जालना ( राम राठोड )
परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथीलमित्राला भेटण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा दुचाकी वर वानराने उडी मारली दुचाकीवरून खाली पडल्याने दत्ता बाबासाहेब कोरडे वय 45 पिंपळी धामणगाव हे जखमी झाले होते या जखमीचा बुधवारी मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात भेटण्यासाठी मंगळवारी सकाळी गावातून दुचाकी वर परतुरला जाण्यासाठी घरातून निघाले होते आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गाडी जात असताना समोरून गाडीवर वानराने उडी मारली यात दत्ता कोरडे मोटरसायकल वरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ जालना खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यांच्या पशचात वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे