Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात ना. नितेश राणे यांचा सत्कार

Admin by Admin
April 17, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात ना. नितेश राणे यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील एक अग्रगण्य संस्था असून, एकाच छताखाली महाप्रसाद सेवा अशा धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कार्य हे नामवंत असल्याचे मनोगत राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी व्यक्त केले. त्यांच्या समवेत आमदार गोपीचंद पडळकर (जत वि.स.स.), आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार हे उपस्थित होते.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत अमोलराजे भोसले यांच्या हस्ते ना.नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर (जत वि.स.स.) यांचा श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
आमदार गोपीचंद पडळकर (जत वि.स.स.) म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने गेल्या ३८ वर्षाच्या कालखंडात श्री स्वामी भक्तांच्या सेवेबरोबरच न्यासाकडून सुरु केलेल्या दिव्यांग व निराधारांना समर्थ महाप्रसादसेवा, शहर व तालुक्यातील कुस्तीगीरांसाठी प्रसादरुपी खुराक दिला जातो. अशा या योजना न्यास राबवीत आहे. ही बाब कौतुकास्पद असून, राज्यातील धर्मादाय संस्थांनी अन्नछत्र मंडळाचा आदर्श घेतला पाहिजे. याबरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासात अन्नछत्र मंडळामुळे भर पडत असल्याचे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
त्यांच्या समवेत गोरक्षक सुधीर बहिरगोंडे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, मिलन कल्याणशेट्टी, अभिषेक लोकापुरे, कांतु धानशेट्टी, सुनिल कटके, प्रथमेश पवार, राजेंद्र बंदीछोडे, बाबुराव जानकर, अमोल कारंडे, माऊली हळणकर, उमेश पांढरे, महेश कोकरे, सिद्धेश्वर जाधव, नागेश कलशेट्टी, सिद्धेश्वर माळी, प्रथमेश जोजन, योगेश कटारे, राहूल जोजन यांच्यासह आदीजण उपस्थित होते. 
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे काका, सौरभ मोरे, मनोज निकम, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी,निखील पाटील, गोटू माने, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, स्वामीनाथ बाबर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, धानप्पा उमदी, सुभाष पेठकर, चंद्रकांत हिबारे, किरण साठे, रोहित कदम, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, शुभम कामनुरकर, शुभम चव्हाण, करण पुजारी, विकी जाधव, महेश झंपले, शिरीष भोसले, महेश जामदार, अमोल हरवाळकर, गीत पवार, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान राणे कुटुंबीयांचे श्रद्धास्थान – ना.नितेश राणे

Next Post

भगवान बुद्ध आणि चार आर्यसत्य 

Admin

Admin

Next Post
भगवान बुद्ध आणि चार आर्यसत्य 

भगवान बुद्ध आणि चार आर्यसत्य 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157105
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697