शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पालक मेळाव्याला पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसाद
नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम हुसेनसाब )
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शासकीय निवासी शाळेनी प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पालक मेळावा व संस्कृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे. उमरी मुख्याध्यापक शेख नवाज मिनगिरे म्हणाले की शाळेतील शिक्षण हे काय आहे महत्त्व सांगितले शिक्षणाबाबत शाळेचे नाव कसे वाढवावे असे मिनगिरी यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक तुपकरी ,संस्कृतिक प्रमुख श्रीमती बेंद्रीकर , कराळे , सोनाळे श्रीमती कल्याणकर , शेख , इंगळे ,सय्यद आदिनी या कार्यक्रमाचा यशस्वी परिश्रम घेतले.
पालकांनी शाळेच्या सुविधा शिक्षणाबद्दल आपले विचार मांडले पालक परबतरा हणमंते पालक किरण वाघमारे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की शाळेतील भोजन राहण्याची सोय व विद्यार्थ्यांचे आरोग्याची अडचणी आणि शाळेतील सुविधा अतिशय सुंदर अनेक सुविधा उपलब्ध करून देणारे शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक हत्ते यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून त्याबद्दल दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.