सामाजिक

अक्कलकोट आकांक्षीत तालुका कार्यक्रम संपूर्णतः अभियान समापन कार्यक्रम संपन्न       

   अक्कलकोट ( प्रतिनिधी ) निती आयोग भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार आकांक्षीत तालुका अक्कलकोट अंतर्गत दिनांक 01.07 2024 ते 30.09.2024 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 04.10.2024 रोजी मल्लिकार्जुन मंगल कार्यालय अक्कलकोट येथे मा. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर व मा. कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून संपन्न झाला.                      नीती आयोगामार्फत सुरू असणाऱ्या आकांक्षीत तालुका या योजनेत एकूण 40 इंडिकेटर वरती काम चालू आहे मात्र त्यापैकी सहा इंडिकेटर चे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सदरचे संपूर्णता अभियान सुरू करण्यात आलेले होते या अभियानांतर्गत तालुक्यातील गरोदर महिला नोंदणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, गरोदर महिलांना सकस आहार देणे विशेष जागृती, महिला बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे आणि कृषी विभाग अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्याचे हेल्थ कार्ड तयार करणे प्रमुख उद्दिष्ट होते.                                    या कार्यक्रमासाठी अक्कलकोट तालुक्यातील सरपंच सर्व विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी ,तलाठी कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, अशा सेविका यांची उपस्थिती होती या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय अधिकारी व उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रमुख अतिथी यांनी मनोगत व्यक्त करून यापुढेही आकांक्षीत तालुका योजनेतील उर्वरित 34 सिंडिकेटरवर काम करणे बद्दल प्रोत्साहित केले.                       सदर कार्यक्रमास तहसीलदार  विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, दक्षिण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक  महेश स्वामी, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडे, उपअभियंता राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ दिनेश मुरूमकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक, आकांक्षीत तालुका फेलो प्रीती रोकडे, यंग फेलो निकिता गायकवाड, विस्ताराधिकारी भोरे पठाण, कोळी ,निलुरे, पोतदार, मठ,निकम,बोरगाव, वाघमोडे, राठोड, कोरे, जमादार,कोरे, दामटे, अंजूटगी, कनाळ, ग्राम तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले  यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button