यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कबड्डी मुलींचा संघ जिल्हा उपविजयी

करमाळा ( आयुब शेख )- येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा महाविद्यालयाच्या 19 वर्षीय मुली संघाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सांगोला या संघाबरोबर फायनल अटीतटीच्य सामन्यांमध्ये 1 गुणाने उपविजेतेपद मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्रा. दिपक ठोसर , शारीरिक शिक्षक प्रा. राम काळे , प्रा.संध्या बिले, प्रा. सुरेखा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , उपप्राचार्य संभाजी किर्दाक ,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.