पाथरीत बौद्ध आणि मातंग समाजाचा एकत्रीत संवाद मेळावा संपन्न

सोनपेठ / परभणी ( मंजूर मुल्ला )पाथरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पाथरी मतदारसंघातील बौद्ध आणि मातंग समाजाचे एकत्रीत संवाद मेळाव्याचे आयोजन दिनांक तीन ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता पी पीएल ग्राउंड बाबुल्तार रोड येथे आयोजित करण्यात आले होते हा मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुरार्णी यांच्या उपस्थितीमध्ये
पार पडला आहे.तर
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गणपत भिसे l सरसेनानी लाल सेना, हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शामराव ढवळे, आनंद धनले, रामेश्वर पंडित, विठ्ठल साळवे, मिलींद आठवे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश इंगळे प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राजेश घोडे सेनाप्रमुख आझाद क्रांती सेना, यांची उपस्थिती होती.तर प्रमुख उपस्थितीमध्ये एडवोकेट डि. बी. निसर्गगंध, सदाशिव थोरात, जिजाभाऊ साळवे, राहुल ब्रम्ह्माक्षे, विशूध्दानंद वैराळ, नितेश भोरे, माऊली वैराळ, दादाराव गवारे यांची उपस्थितीमध्ये हा भव्य मेळावा पार पडला.या कार्यक्रमात पाथरी परिसरातील बौद्ध व मातंग समाजातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते. व तसेच या मेळाव्यादरम्यान ABS क्रांती फोर्स चे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश लालझरे यांच्यासह मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला.