शैक्षणिक
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षण शास्त्र व विस्तार विभागामध्ये एक दिवसीय लेट अस ड्रीम; कम्युनिटी इंटरव्हेन्शन कॉन्फरन्सचे आयोजन

पुणे ( प्रतिनिधी )
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षण शास्त्र व विस्तार विभागामध्ये दिनांक २८ सप्टेंबर रोजी एक दिवसीय लेट अस ड्रीम; कम्युनिटी इंटरव्हेन्शन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. ख्राईस्ट अभिमत विद्यापीठ व सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कॉन्फरन्सचे उद्दिष्ट होते की, विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या पण प्रकाशझोतात नसणाऱ्या स्वयंसेवी व्यक्तींचे गौरव करून त्यांचा कामाबद्दल जाणून घेणे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकार्याबद्दल प्रेरित करणे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. विजय खरे, शिक्षण शास्त्र प्रशालेचे संचालक प्रा. विलास आढाव, शिक्षण शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. गीता शिंदे व ख्राईस्ट अभिमत विद्यापीठाचे अधिष्ठाता फादर लीजो हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, दिव्यांग अभ्यास व सर्व समावेशक केंद्राचे समन्वयक धनंजय भोले यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा. विजय खरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना समाजकार्याविषयी प्रेरित करण्यासाठी व समाजाचा सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या आयोजनांची गरज आहे. तर प्रा.विलास आढाव यांनी समाज संघटनेचे महत्त्व विषद केले.
समाजकार्याविषयी बोलणाऱ्या १२ व्यक्तींची शिक्षण, समाजकार्य व आरोग्य या ३ गटांमध्ये विभागणी करून गटचर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ. रवींद्र नांदेडकर, माधवी पटवर्धन, तुषार कांबळे, श्रूत फरांदे, डॉ. स्वाती सदाकळे, मॅथीव ड्यॅनियल इत्यादी व्यक्ती सहभागी झाले होते.त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप समारंभामध्ये राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर व विद्यापीठ अधिसभा सदस्य . डी. पी. पवार व . कृष्णा भंडाळकर उपस्थित होते. समारोप समारंभामध्ये बोलताना . रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले की, राष्ट्रनिर्मितीसाठी आजच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेल्या समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींचे मोलाचे योगदान असेल. कॉन्फरन्ससाठी १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग मिळाला.
