Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जनतेच्या पाठबळावर विधानसभा निवडणूक जिंकणारच – डॉ मीनलताई खतगावकर

Admin by Admin
September 13, 2024
in राजकीय
0
जनतेच्या पाठबळावर विधानसभा निवडणूक जिंकणारच – डॉ मीनलताई खतगावकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )

नायगावचे भाजपचे आमदार यांच्यावर टीकास्त्र सोडताना सरपंचांचा व कार्यकर्त्यांचा अपमान करून विकास होत नाही.माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगांवकर हे भाजपची साथ सोडणार असल्याचे चित्र आज दि.12 सप्टेंबर रोजी गुरुवारी स्पष्ट झाले. बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे आयोजित नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात खतगांवकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचे ठरावही पारीत करण्यात आले. आगामी लोकसभा पोटनिवडणूकीत प्रा.रवींद्र चव्हाण व विधानसभा निवडणुकीत नायगांव मतदार संघातून डॉ.मीनलताई खतगांवकर यांना निवडून आणणारच असा निर्धारही यावेळी माजी खासदार भास्करराव खतगांवकर यांनी व्यक्त केला.खतगांवकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयाने भाजपा व माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांना मात्र जोरदार धक्का बसणार आहे
आमदार. खासदार, मंत्री अशा विविध पदावर प्रदीर्घ काळ कार्य केलेले भास्करराव खतगांवकर यांची नांदेड जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख आहे.सध्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदी कार्यरत असून 2019 च्या लोकसभा निवडणुकी आधी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचा हात धरला.नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून आपल्या सुनबाई डॉ.मीनलताई खतगांवकर यांना संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते.पण उमेदवारी मिळाली नाही.त्यामुळे खतगांवकर नाराज होते.सध्या नायगांव विधानसभा मतदार संघात त्यांनी लक्ष घातले होते.परंतु खतगांवकर भाजपाला रामराम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरूच होती.त्यास शंकरनगर येथील मेळाव्याने बळकटी मिळाली.
यावेळी भास्करराव खतगावकर यांनी आजची कार्यकर्त्यांची भावना हीच माझी राजकीय कमाई असल्याचे सांगत मी काँग्रेस मध्ये चाललोय या शब्दात आपली पुढील वाटचाल अधोरेखित केली.मी काँग्रेस मध्ये गेल्यावर चित्र बदलेल असा दावा करत नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीत प्रा. रवींद्र चव्हाण व आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. मीनलताई खतगांवकर यांच्या माध्यमातून काँग्रेसला निवडून आणणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
नायगांव विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या डॉ.मीनलताई खतगांवकर यांनी भाजपात असतांना भास्करराव खतगांवकर यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले.आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आजचे जनसमर्थन बघून भारावल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी राजू गंदिगूडे यांनी मांडलेला काँग्रेस पक्षप्रवेशाचा ठरावही पारीत करण्यात आला.
या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास डॉ.मीनलताई खतगांवकर, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी उपमहापौर सरजीतसिंग गिल, माजी उपसभापती प्रताप पाटील जिगळेकर, राजू गंदिगुडे, भावना दाशेटवार,आनंद बिराजदार, भीमराव जेठे,मंगल देसाई,शिवकुमार पाटील, जयवंत गायकवाड, प्रा.जीवन चव्हाण, शेख नवाबसाब, नागनाथ अनंतवाड,सहाय्यक कोकणे,शेख बबलू,किशोर पाटील,साळवे, आदिसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या पाठबळावर विधानसभा निवडणूक जिंकणारच –
डॉ मिनलताई खतगावकर
.विधानसभेला काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजय खेचून आणणारच असा आत्मविश्वास डॉ मिनलताई खतगावकरांनी विराट सभेत व्यक्त केला.तसेच भाजपा मध्ये भास्करराव खतगावकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.नायगावचे भाजपचे आमदार यांच्यावर टीकास्त्र सोडताना सरपंचांचा व कार्यकर्त्यांचा अपमान करून विकास होत नाही. या शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आगामी काळात विकास कामाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू असा आत्मविश्वासही डॉ मिनल खतगावकरांनी व्यक्त केला.

Previous Post

तरविंदरसिंह मारवाहच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपने भुमिका स्पष्ट करावी – नाना पटोले

Next Post

वागदरी येथील  रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

Admin

Admin

Next Post
वागदरी येथील  रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

वागदरी येथील  रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697