अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत या राष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष
पदी अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील रेखा सोनकवडे यांची आपली निवड करण्यात आली..
महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली ही संघटना महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगीक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, या व अशा अनेक महिल्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी काम करते. या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी रेखा सोनकवडे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र किसनराव काशिद पाटील राष्ट्रीय अध्यक्ष, महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत यांच्याकडून देण्यात आले. या निवडी बद्दल रेखा सोनकवडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.






