टॉप न्यूज
तरविंदरसिंह मारवाहच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपने भुमिका स्पष्ट करावी – नाना पटोले
मुंबई -तरविंदरसिंह मारवाहच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपने भुमिका स्पष्ट करावी अशी टिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह याचे विधान अत्यंत आक्षेपार्ह व भडकाऊ आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी तीन बलिदान दिली आहेत. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे, तरीही राहुलजी गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. राहुलजी गांधी घाबरत नाहीत म्हणून आता त्यांना संपवण्याचीच भाषा केली जात आहे. भाजपाच्या नफरतच्या फॅक्टरीत तयार झालेल्या तरविंदरसिंह मारवाहच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपने भुमिका स्पष्ट करावी असे नाना पटोले म्हणाले.




