सामाजिक
अक्कलकोटमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा ०२ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रे आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या संदर्भात अक्कलकोट पंचायत समितीत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एम. के. शेगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी विभुते यांच्यासह अनेक लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते.
गृहनिर्माण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
