सामाजिक

उडगी ते तोळणूर रस्त्याचे काम अर्धवट

 

 नागरिकांसह वाहनधारकातून संताप
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्त्याच्या कामाची सुरुवात करून अर्धवट स्थितीत थांबविण्यात आले आहे. सदरच्या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांसह वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तत्परतेने निधी देऊन उडगी ते तोळणूर रस्त्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता. पण ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे उडगी ते तोळणूर रस्त्याचे काम रखडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
 अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्त्याच्या नूतनीकरण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली होती. नागरिकांच्या होणाऱ्या रस्ते दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष देत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उडगी ते तोळनूर रस्त्यास निधी देऊन कामास सुरुवात करण्यात आली होती. पण तोळणूर गावाजवळील काही शेतकऱ्यानी या रस्त्याच्या कामास अडथळा आणत रोखला आहे. यामुळे या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम थांबले आहे. तोळनूर ते उडगी मार्गे अक्कलकोट शहरास येण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा आहे. तोळनूर सह परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक अक्कलकोट शहराकडे येण्यासाठी व जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करत आहेत. उडगी ते तोळणूर रस्त्याचे काम थांबविण्यात आल्याने वाहनधारकांना तसेच दुचाकी वाहन चालकांना अतिशय खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. उडगी ते तोळणूर खराब रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. उडगी ते तोळणूर रस्त्यावरील रहदारी पाहता हा रस्ता त्वरित दुरुस्त करून नवीन बनविण्यात यावा अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकातून केली जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन हे रस्ते विकासाचे काम थांबल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उडगी – तोळणूर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button