Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रा गे शिंदे गुरुजी यांची 100 वी जयंती विविध उपक्रमाने होणार साजरी

Admin by Admin
September 3, 2024
in शैक्षणिक
0
रा गे शिंदे गुरुजी यांची 100 वी जयंती विविध उपक्रमाने होणार साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रा गे शिंदे गुरुजी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात उभारणार भव्य दिव्य गुरुजींचा पुतळा .
अनेक उपक्रमांनी साजरा होणार जयंती उत्सव .

परंडा ( फारूक शेख )
परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . रामचंद्र गेनुजी शिंदे गुरुजी यांची शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे . संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत ही शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असल्याचे सांगितले आहे .सालाबाताप्रमाणे याही वर्षी दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या जयंती सप्ताहामध्ये पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये दिनांक 2 सप्टेंबर रोजी प्रतिमापूजन तर 3 सप्टेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रात्यक्षिक उपक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री एस एच साळुंखे विस्ताराधिकारी तथा गटशिक्षण कार्यालय भूम जिल्हा धाराशिव व श्री सांगळे यांनी मार्गदर्शन केले . विज्ञान प्रदर्शन – विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले .यामध्ये सर्व तालुक्यातील शाळांचा सहभाग होता . दिनांक 4 सप्टेंबर रोजी आनंदनगरी फण फेअर उपक्रम तसेच दि . पाच सप्टेंबर रोजी शैक्षणिक सामाजिक संदेश देणारी कै . रा गे . शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेची भव्य रॅली आयोजित केली आहे . दिनांक 6 सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .प्रसिद्ध कृषिरत्न बी बी ठोंबरे अध्यक्ष नॅचरल शुगर व अलाईड इंडस्ट्रीज रांजणी हे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत . दि . 7 सप्टेंबर रोजी गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून हा जयंती सप्ताह संपन्न होणार असल्याचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी कळविले आहे . विविध स्पर्धेचे आयोजन करत असताना त्या स्पर्धेचे परीक्षक नियुक्त करून स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सांगितले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करत आहेत . याप्रसंगी प्राचार्य डॉ सुनील जाधव , वरिष्ठ प्राध्यापक डॉ हरिश्चंद्र गायकवाड,उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने, स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अध्यक्ष श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ ,विविध समितीचे चेअरमन प्रा डॉ विद्याधर नलवडे ,प्रा डॉ अमर गोरे पाटील, प्रा विजय जाधव,प्रा सौ किर्ती नलवडे, प्रा डॉ सचिन चव्हाण ,प्रा डॉ प्रशांत गायकवाड, प्रा जगन्नाथ माळी, प्रा सचिन साबळे तसेच या शैक्षणिक सामाजिक रॅलीमध्ये आयोजित केलेल्या विविध समित्याचे चेअरमन प्रा बी डी माने, प्रा सौ मोरवे परवीन , प्रा तानाजी फरतडे , प्रा रामेश्वर गायकवाड,प्रा दीपक हुके, प्रा शंकर कुठे ,यांच्यासह अनेक समितीचे सदस्य सहकार्य करत आहेत .

Previous Post

शिक्षण,संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना काळाची गरज- पी आय.. विनोद घुगे

Next Post

व्हॉईस ऑफ मिडिया राज्यस्तरिय शिखर दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी . येथे सपन्न

Admin

Admin

Next Post
व्हॉईस ऑफ मिडिया राज्यस्तरिय शिखर दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी . येथे सपन्न

व्हॉईस ऑफ मिडिया राज्यस्तरिय शिखर दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी . येथे सपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157421
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697