Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उजनीचे पाणी आणल्याचा आजी – माजी आमदाराचां दावा , पाण्याचे राजकारण पेटणार !

Admin by Admin
September 2, 2024
in राजकीय
0
उजनीचे पाणी आणल्याचा आजी – माजी आमदाराचां दावा , पाण्याचे राजकारण पेटणार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी) उजनीचे पाणी हरणा नदीत पोहोचल्याने येत्या दोन दिवसात कुरनूर धरणात पोहोचणार असल्याने अक्कलकोट तालुका वासियातून समाधान व्यक्त होत आहे.
 दर्गनहळी कुंडातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध तलाव भरून घेण्यात आले. दिनांक 1 सप्टेंबर नंतर जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार दर्गनहळली वितरण कुंडातून नदीकडे उजनी धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. एक टीएमसी पाण्यातच एकरूप उपसा सिंचन योजनेतील सर्व तलावासह भरून होणार आहे. त्यामुळे एक टीएमसी पेक्षा कमी पाणी धरणात सोडण्यात येणार आहे.
    कुरनूर धरणाची पाणी साठवून क्षमता 0.82 टीएमसी असून या खालील सिंचन क्षेत्र दहा हजार एकशे दहा हेक्टर असून सध्याचे स्थिती पाहता 36 टक्के होऊन अधिक पाणीसाठा उजनी धरणात आहे धरणाच्या खालील बंधाऱ्यची एकूण आठ आठ बंधारे असून यावर 51 गावांची लिस्ट आहे धरणाला नऊ दरवाजे असून बोलणे हरणा नदीच्या संगमावर धरण असून उजनी ते करून धरण 226 किलोमीटर अंतर पार करून पाणी करून धरणात पोहोचणार आहे. 
पाण्याच्या प्रवाहानुसार कुरुल धरणात पाणी येत्या दोन दिवसात पोहोचणार आहे.
  उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्याला मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा संपणार असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गत विधानसभा निवडणुकीत उजनीचे पाणी आणणार असे सांगितले होते.. तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे.
गेली वीस वर्षे तालुक्याचे राजकारणात उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कुरनूर धरणाभोवती फिरत होते. या कामे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,  ना. अजित  पवार, पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या पाण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने सदरचे यश मिळाले आहे सांगितले जात आहे.
     एकरूप प्रकल्पाचे भूमिपूजन भूमिपूजन दर्गनहळी येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते गेल्या 30 वर्षापासून शासकीय निधी उपलब्ध नसणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता आणि महाराष्ट्रातील सत्तांतर आदी अनेक कारणामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रखडला होता. सन 2021 मध्ये एकरूख सिंचन योजनेची चाचणी घेण्यात आली होती दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उजणीचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण अस्त्र उगारले. तीस वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा खर्च 24 कोटी इतका होता शासनाच्या वेळ काढून पणामुळे या योजनेचा खर्च साधारणपणे 250 कोटीच्या घरात गेला आहे.
 अक्कलकोट व आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आमदार बदलले पाणी प्रश्न मिटला नव्हता तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या योजनेवर मते मिळविली सध्या समाज माध्यमातून अक्कलककोट दक्षिण तालुक्यातील गावांसाठी एकरूप योजनेची पाणी येण्याचे पाणी कोणी आणले यावरून वाक्य युद्ध सुरू आहे एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यातील बागायती क्षेत्र क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती दिलासात्मक होऊन जीवनमान उंचावणार आहे. 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 आणि अक्कलकोट तालुक्यातील 51 गावे अशा 72 गावे उजनीच्या पाण्यापासून वंचित होती या गावातील एकूण 17310 हेक्टर  क्षेत्राच्या सिंचनासाठी एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण होणे काळाची गरज होती. दरम्यान सन 2019 सालच्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत काही गावांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यावी लागली होती. एकरूप योजना पूर्ण होऊनही उजनी डावा कालवा शाखेतील सोडलेले पाणी पुढे कारंबा शाखेनंतर एकरूप तलावापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. उजनी धरणाची निर्मिती होऊन 45 वर्षे झाली अक्कलकोट तालुक्याला  हक्काचे पाणी मिळणार असून यामुळे हरितक्रांती धवलक्रांती होण्यास  योगदान मिळणार आहे. उजनीच्या पाण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठपुरावा केल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. यामुळे विधानसभा निवडणूकीत कुरनूर धरणाचे पाणी तापणार असे बोलले जात आहे.

Previous Post

अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन

Next Post

शिक्षण,संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना काळाची गरज- पी आय.. विनोद घुगे

Admin

Admin

Next Post
शिक्षण,संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना काळाची गरज- पी आय.. विनोद घुगे

शिक्षण,संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना काळाची गरज- पी आय.. विनोद घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697