टॉप न्यूज
अक्कलकोट येथे महाविकास आघाडीतर्फे मूक धरणे आंदोलन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – बदलापूर येथील शाळेत झालेल्या विद्यार्थ्यांनींच्या आत्याचारा बाबत महाविकास आघाडीच्या वतीने एवन चौकातील हुतात्मा स्तंभासमोर काळ्या फिती लावून माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली मुक धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. धरणे आंदोलना नंतर वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले की,राज्यात कायदा व सुव्यवस्था कांहीच राहिली नाही. सामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. गुंडगीरीचे राज्य चालू आहे. गृहखाते निष्क्रिय झाले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. राज्यात महिला अजिबात सुरक्षित नाहीत. रोज कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होत आहेत. एकीकडे शासन लाडकी बहिण योजने खाली महिलांना लाच देऊन विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे. त्या महिलेच्या मुली सुरक्षीत नाहीत.
बदलापूर येथे घडलेली घटना हि अत्यंत लाजिरवाणी आहे. हे कृत्य करणाऱ्या नराधमांस कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही म्हेत्रे म्हणाले.
या आंदोलनात , जि. प. चे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा कु.शितल म्हेत्रे,माजी सभापती सिध्दार्थ गायकवाड,युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील, युवानेते प्रथमेश म्हेत्रे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आनंद बुक्कांनुरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव ,राष्ट्रीवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू, सुनील कटारे, सद्दाम शेरीकर, राम जाधव, शिवपुत्र हळगोदे, शाकिर पटेल, शरणू अळ्ळोळी, सिध्दाराम भंडारकवठे, शिवराज पोमाजी, राहुल मोरे, बालाजी शाॅपवाले, शदिद वळसंगकर, वकील बागवान, मत्तीन पटेल, रामचंद्र समाणे, शिवशरण इचगे, नंदु कटारे, किरण जाधव, मल्लिकार्जुन काटगांव, शिवाजी कलमदाणे, शबाब शेख, कु. सोमेश्वरी कोळी, पल्लवी फूले, लक्ष्मी कोळी, श्रृती खवळे, लक्ष्मी गिरबोणे, अनिता बीराजदार, राजश्री टोणे, नंदिनी खवळे, पार्वती कोळी, रूपाली साळुंखे, आलीया फुलारी आदी उपस्थित होते.



