Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नरसी मुस्लिम समाजातर्फे निषेध

Admin by Admin
August 24, 2024
in महाराष्ट्र
0
नरसी मुस्लिम समाजातर्फे निषेध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

रामगिरी महाराज यांना अटक करा पोलिसांना दिले निवेदन.

नायगाव / नांदेड :- सय्यद अजिम नरसीकर

समाजात गैरसमज पसरवून प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करून शांतता भंग करीत असलेल्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याकरिता नरसि येथील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने रामतीर्थ पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदन देण्याकरिता मुस्लिम समाजाचे शेकडो नागरिक नरसी फाटा पोलीस चौकी येथे जमा झाले होते तसेच सर्व नागरिकांनी शांततेने निषेध व्यक्त केला.
कोणताही धर्म इतर धर्माबाबत टीका करण्याचे शिक्षण देत नाही तसेच मुस्लिम समाज प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि पूर्वीपासून करीत आलेला आहे. परंतु सध्या धर्माचे राजकारण सुरू आहे, धार्मिक भावना भडकावून जातीय दंगली होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समाजात जातीय दंगली होऊ नये व शांतता व सालोख्याचे वातावरण रहावे व भारतीय संस्कृतीची विविधतेतून एकतेची प्रतीक आहे त्या संस्कृतीचे रक्षण व्हावे व समाजात दंगली होऊन सामाजिक नुकसान होऊ नये याकरिता रामगिरी महाराज विरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने शब्द उच्चारण, धार्मिक भावना भडकावणे, धर्मावरून गटांमधील वैर वाढवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे याकरिता भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई होणे जरुरीचे आणि आवश्यक आहे. त्याकरिता मुस्लिम समाज एकत्र येऊन सदर तक्रार अर्ज देत आहे असे मुस्लिम समाजातर्फे सांगण्यात आले.
मुस्लिम समाज संविधानाचा आदर करतो व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या संविधानाच्या मर्यादे अंतर्गतच आम्ही रामगिरी महाराज यांना अटक करावी अशी मागणी करत आहोत असे मुस्लिम समाजातर्फे सांगण्यात आले.
नरसी पोलीस चौकी येथे आल्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी निरिक्षक श्रीधर जगताप व मंडळाधिकारी अरविंद कावळे, तलाठी बामणीकर तातेराव,तलाठी पुणेकर डि.एस.यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुस्लिम समाजचे धर्म गुरूवर्य खारी शाहिद रजा,ग्रामपंचायत सदस्य सय्यद इस्माईलसाब ,सय्यद इसाक हाजी हुसेनसाब नरसीकर,पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल,उपसरपंच अलीम बेग पटेल,चॉंद कुरेशी,गौस मामू ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी मोहीदीन शेख ,सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी रफीक पठाण,रफीक पटेल ,माजिद भाई मेकानिक,पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब, शेख अहेमद पत्रकार, मुबारक शेख,ग्रामपंचायत सदस्य रफीक शेख, ईरफान टिपु, रबानी बागवान,रफीक शेख,एजास रजा ,रिजवान कुरेशी यासह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Previous Post

सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

Next Post

अक्कलकोट येथे महाविकास आघाडीतर्फे मूक धरणे आंदोलन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे महाविकास आघाडीतर्फे मूक धरणे आंदोलन

अक्कलकोट येथे महाविकास आघाडीतर्फे मूक धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697